मुंबईत एअर अॅम्ब्युलन्स विमानाचं इमरजन्सी बेली लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित
मुंबईत विमानाचा इमरजन्सी लॅंडिंग
मुंबई : ई-एअर सेवा रूग्णांच्या मदतीसाठीही वापरली जाते. एक अॅम्ब्युलन्स, जी पेशंटसह नागपूरहून हैदराबादकडे जात होती, पण मध्येच विमानाला मुंबईकडे वळवावी लागली. अशी माहिती मिळाली आहे की जेव्हा विमान नागपूरहून सुटणार होते तेव्हा त्याचा एक टायर तो जमिनीवर पडला. अशा परिस्थितीत त्या विमानाचे तातडीने मुंबईत लँडिंग करण्यात झाले.
सी-90 विमान नागपूरहून हैदराबादसाठी उड्डाण केले होते. एअर अॅम्ब्युलन्समध्ये क्रू मेंबर्स, एक डॉक्टर आणि एक रूग्ण असे एकूण पाच लोक उपस्थित होते. पण एअर अॅम्ब्युलन्स नागपुरातून सुटताच त्यात काही अडचण निर्माण झाली. असे आढळून आले की नागपूर विमानतळावरुन टेकऑफ केल्यानंतर एक चाक खाली कोसळले आणि जमिनीवर पडले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उड्डाणातील उपस्थित वैमानिकांनी समजूतदारपणा दाखवत बेली लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. ते विमान मुंबईत सुखरूप उतरण्यात आले. आता मुंबईतील रूग्णालयात रुग्णाला दाखल केले आहे.
सर्व प्रवासी सुरक्षित
उड्डाणातील सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघाताची काही छायाचित्रेही समोर आली आहेत, ज्यात असं दिसत आहे की, बेली लँडिंग केली नसती तर मोठा अपघातही होऊ शकला असता. पण वैमानिकांनी वेळीच योग्य निर्णय घेतला.
या घटनेनंतर मुंबई विमानतळाकडूनही निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात असे म्हटले आहे की, गुरुवारी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी मुंबई विमानतळावर एअर अॅम्ब्युलनचं लँडिंग करण्यात आली. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून आधीच आवश्यक पथक स्टँडबाईवर ठेवण्यात आले होते. सीआयएसएफ, बचाव आणि वैद्यकीय पथकही घटनास्थळी उपस्थित होते. सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
सुरक्षित लँडिंगसाठी धावपट्टीवर 'फोम' लावल्याचे वृत्त आहे. असे म्हटले जाते की ती एअर अॅम्ब्युलन्सलाही आग लागण्याची ही शक्यता होती. सर्व खबरदारी आधीच घेण्यात आली होती. विमानही अपघातातून बचावले असून सर्व प्रवासीही सुखरुप आहेत. पण या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.