अजित पवार आणि बाळासाहेब थोरात राज्यपालांच्या भेटीला
काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते राज्यपालांना भेटण्यासाठी मुंबईत राज्यपालांचं निवासस्थान राजभवनाव
मुंबई : काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते राज्यपालांना भेटण्यासाठी मुंबईत राज्यपालांचं निवासस्थान राजभवनावर पोहोचले आहेत. शेतकऱ्यांना जास्तच जास्त मदत मिळावी, अशी मागणी करण्यासाठी अजित पवार आणि बाळासाहेब थोरात राज्यपालांची भेट घेण्यासाठी गेले असल्याचं सांगण्यात येत आहे. याआधी भाजपा नेते विनोद तावडे यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी नेमके काय पर्याय आहेत, याची माहिती देण्यासाठी विनोद तावडे यांना राज्यपालांच्या भेटीसाठी पाठवले असल्याचं सांगण्यात येत आहे.
या आधी काल शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. ही सदीच्छा भेट असल्याचं संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आलं, पण ज्या प्रकारे राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत अस्थिरता सुरू आहे, त्याविषयी ही भेट असल्याचं सांगण्यात येत आहे.