मुंबई : Devendra Fadnavis on Ajit Pawar : महाविकास आघाडी सरकावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल चढवला. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला कोणतीच किंमत राहिलेली नाही. सगळा कारभार अनागोंदी सुरु आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. (Ajit Pawar's words have no value in Maha Vikas Aghadi government - Devendra Fadnavis)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील शेतकरी हवालदीत असताना त्यांच्या प्रश्नावर कोणालाही पडलेली नाही. तसेच आज अनेक प्रश्न आहेत आणि आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा करण्यासाठी तयार आहोत. राज्यातील अनेक मुद्दे मांडण्याची आमची तयारी आहे. पण सरकारनेही हे अधिवेशन नीट सहकार्याने चालवायला हवे, असे फडणवीस म्हणाले.


 राज्यातील शेतकऱ्यांचे वीज मीटर कापले जात आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याआधीच्या अधिवेशनात शेतकऱ्यांचे वीज मीटर कापले जाणार नाहीत, असा शब्द दिला होता. त्यानंतर मीटर कापावे लागतील असे शेवटच्या दिवशी म्हणाले. म्हणजेच अजित पवार यांच्या शब्दाला सरकारमध्ये काहीच किंमत राहिलेली नाही, हे सिद्ध झाले आहे. महाविकास आघाडी सरकार हे सावकारी सरकार आहे, अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.



नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मात्र, तसे होताना दिसून येत नाही. एका विशिष्ट समाजाला सिग्नल देण्याचा प्रयत्न  होत आहे. संजय राठोड यांचा राजीनामा तात्काळ घेतला. पण नवाब मलिक यांनी देशद्रोह्याबरोबर व्यवहार केल्यानंतरही त्यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप फडवणीस यांनी घेतला. आधी राजीनामा घ्या, तरच अधिवेशन सुरळीत चालू देऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.