मुंबई : Maharashtra Assemly : आज शिंदे फडणवीस सरकारची बहुमत चाचणी झाली. सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करीत भाषण केले. यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना मिश्किल टोले लगावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीस यांना अनेक वर्ष सभागृहात भाषण करता पाहिलं, पण आज त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचा उत्साह नव्हता. तुमचा जो जोश असायचा, मुख्यमंत्री असतानाही पाहिला आणि विरोधी पक्ष नेते असतानाही पाहिला. सर्व पीन ड्रॉप सायलेन्समध्ये तुमचं भाषण ऐकायचं, आज एकनाथ शिंदे यांची कारकिर्द कशी दैदिप्यमान आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. असे अजित पवार यांनी म्हटले.


यावेळेस विधीमंडळात जे काही आमदार निवडून आले, त्या आमदारांमध्ये सर्वात नशीबवान कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत.  त्याचं कारण असं आहे की अजून अडीच वर्षच झाली, पुढची अडीच वर्ष बाकी, पण अडीच वर्षात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पण झाले, उपमुख्यमंत्री पण झाले, आणि विरोधी पक्षनेतेपदपण झाले, सर्व महत्त्वाची पदं फडणवीस यांनी भूषवली. असे अजित पवार यांनी म्हटले.