व्हिडिओ : आकाश-श्लोकाची प्री एन्गेजमेंट पार्टी
आकाश अंबानी लवकरच बालमैत्रिण श्लोका मेहतासोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
मुंबई : मुकेश आणि नीता अंबानींचा मोठा मुलगा आकाश अंबानी लवकरच बालमैत्रिण श्लोका मेहतासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. २८ जूनला दोघांचीही प्री इंगेजमेंट पार्टी आयोजित करण्यात आली होती. पार्टीत अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. पार्टीत काही विधीही करण्यात आला. या विधींचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि श्लोका मेहता एकत्र विधी करताना दिसत आहेत.
अनिल अंबानींचीही उपस्थिती
आकाशच्या प्री इंगेजमेंट पार्टीत मुकेश अंबानींचे लहान भाऊ अनिल अंबानींही उपस्थिती लावली. ते पार्टीत मुकेश अंबानींचा लहान मुलगा अनंत अंबानीसोबत गप्पा करताना दिसले.
सेलिब्रेटींची हजेरी
पार्टीत अनेक बॉलिवूड स्टार्सनी उपस्थिती लावली. किंग खान शाहरुख खान पत्नी गौरी खानसोबत उपस्थित होता. तर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनीही पार्टीत वर्णी लावली.