मुंबई : मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीचा साखरपुडा ठरल्याची चर्चा सध्या रंगत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्ध हीरा व्यावसायिक रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता हिच्याशी ठरलं आहे. मीडियात आलेल्या वृत्तांनुसार या वर्षाच्या शेवटी दोघांचे लग्न होऊ शकते.


लग्न करणार ?


 यासंदर्भात दोन्ही परिवारांमधून कोणत्या प्रकारचे वक्तव्य अद्याप समोर आले नाही. दोन्ही परिवारांनी यासंदर्भात बोलण सध्या टाळत आहे.


डिसेंबर महिन्याच्या शेवटी दोघ लग्न करणार असल्याचे बोलले जात आहेत. 


डायमंड कंपनीचे मालक 


प्रसारमाध्यमात आलेली वृत्त खरी मानली तर आकाश आणि श्लोका २४ मार्च ला साखरपुडा करणार आहेत.


आकाश हा देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आहे.


मुकेश अंबानी यांना आकाश, ईशा आणि अनंत अशी तीन मुलं आहेत. श्लोकाचे वडिल रसेल मेहता यांची 'रोजी ब्लू डायमंड' नावाची हिरा कंपनी आहे. 


एका शाळेत आकाश आणि श्लोका 


अंबानी आणि मेहता परिवार एकमेकांना अनेक वर्षे ओळखतात. या दोघांनी धीरूभाई अंबानी स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलयं. आकाश अंबानी हा रिलायन्स जियो बोर्डमधील मोठा सदस्य आहे.


श्लोका संचालक पदी


श्लोकाने २००९ मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रिंसटन विद्यापीठातून एंथ्रोपोलॉजी मधून पदवी घेतली. त्यानंतर त्याने लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स मधून लॉ मधून मास्टर डिग्री घेतली.


श्लोकादेखील ब्लू फाऊंडेशनमध्ये २०१४ पासून संचालक आहे. 'कनेक्ट फॉर' ची ती संचालकदेखील आहे.