मुंबई : 'अलिबागवरुन आलाय का'? किंवा 'अलिबाग से आया है क्या'? अशा उल्लेखावर बंदी घालण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलीय. प्रत्येक समाजावर विनोद केले जातात. त्यात मानहानीकारक काही नाही नसल्याचं न्यायालयाने म्हटलंय. तसंच त्याकडे अपमान म्हणून न पाहता उलट प्रत्येकाने त्याचा आनंद लुटावा, असं निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिबाग हे खूप चांगले ठिकाण आहे. इथं पर्यटक आकर्षित होतात. इथं शाळा असून इथले लोकही सुशिक्षितही आहेत. अलिबाग निसर्गसमृद्ध असून, संस्कृती, उद्योग, वैद्यकीय सुविधा आणि शिक्षण हे सर्व असतानाही, या शहराची अशी अहवेलना करणे आक्षेपार्ह आहे. त्यामुळे लोकांना अशी टिप्पणी करण्यापासून रोखण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी अलिबागचे रहिवासी राजेंद्र ठाकूर यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावलीय. 


राजेंद्र ठाकूर यांच्या म्हणण्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला 'मूर्ख' म्हणण्यासाठी महाराष्ट्रात या वाक्प्रचाराचा उपयोग केला जातो.