मुंबई : मुंबईतील सर्व शाळा आणि कॉलेज नवीन वर्षातही बंदच राहणार आहेत.  १५ जानेवारी २०२१ पर्यंत मुंबईतील शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १८ जानेवारीपासून केवळ वाणिज्य दुतावासांच्या शाळा सुरू होणार आहेत. कोवीड संकटामुळं मुंबईतील शाळा, कॉलेज सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबत मुंबई महापालिकेने परिपत्रक जारी केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरानामुळे बंद असलेल्या शाळा सुरु होण्यासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येतेय. मुंबई, ठाणे, रायगडमधल्या शाळा २६ जानेवारीपूर्वी सुरू होण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत मुंबई, ठाणे, रायगडमधल्या शाळा सुरु करण्याची शिक्षण विभागाची तयारी सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. 


याआधी जानेवारीमध्ये शाळा सुरु होणार असल्याची चर्चा होती. पण या चर्चेला विराम लागला आहे.  मुंबई, ठाणे आणि रायगडमधील शाळा प्रजासत्ताक दिनाच्याआधी सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.


कोरोनामुळे शाळा आणि कॉलेज बऱ्याच महिन्यांपासून बंद आहेत. पण आता कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानंतर सरकार आणखी सावध भूमिका घेत आहे. त्यातच देशात ब्रिटनवरुन आलेल्या काही प्रवाशांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढल्या आहेत.