मुंबई : jumbo Covid centers in Mumbai : कोरोनाचे काही ठिकाणी रुग्ण आढळून येत आहे. मात्र, मुंबईत कोरोना पूर्ण आटोक्यात आला असताना सध्या रुग्ण सापडत आहेत. परंतु रुग्णांमध्ये लक्षणं असणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने मुंबईतील सातही जम्बो कोविड सेंटर बंदसाठी आठवडाभरात निर्णय घेतला जाणार आहे. रुग्णच नसल्यानं हजारो बेड रिकामे आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाची कार्यवाही सुरु केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत कोरोना पूर्ण आटोक्यात आला असताना सध्या आढळणाऱ्या रुग्णांमध्ये लक्षणं असणाऱ्यांची संख्या कमी असल्यानं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाणंही केवळ 2 ते 5 टक्क्यांपर्यंत आहे. तर अ‍ॅक्टिव्ह असलेल्या सात जम्बो कोविड सेंटरमधील सुमारे 15 हजार बेडवर फक्त एक टक्क्यापर्यंतच रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे आठवडाभरात जम्बो कोविड सेंटर बंद करण्यासाठी कार्यवाही सुरु करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


 कोविड लसीकरणाचा वेग पुन्हा वाढला


राज्यात कोविड लसीकरणाचा वेग पुन्हा वाढला आहे. लसीकरणाच्या दैनंदीन प्रमाणात दुपटीनं वाढ झाली आहे. बुस्टर डोस घेण्याचं प्रमाणही वाढले आहे. सरासरी दरदिवशी सुमारे सव्वा दोन लाख नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. 


राज्यात जुलैपासून करोनाचा प्रादुर्भाव कमी व्हायला सुरुवात झाल्यावर लसीकरणाचा जोरही कमी झाला होता. मात्र कोरोनाचा वाढता प्रसार तसंच केंद्र सरकानं सुरु केलेली मोफत लसीकरण मोहीम यामुळे लसीकरणाचा वेग पुन्हा वाढला आहे. बुस्टर डोसच्या प्रमाणातही वाढ झालीये. मुंबई, ठाणे, पुण्यात लसीकरणाचा वेग वाढला आहे.