मुंबई : ज्या गेमची सगळीकडे प्रचंड प्रमाणात चर्चा आहे तो म्हणजे 'द ब्लू व्हेल चॅलेंज'. आपल्याला प्रत्येकाला माहितच आहे या गेमचा शेवट हा फक्त मृत्यू एवढंच आहे. हा गेम डाऊनलोड देखील केला जाऊ शकत नाही. नाही अॅप आणि सॉफ्टवेअरद्वारे याला खेळू शकतो. 


कोणी केली याची निर्मिती 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द ब्लू व्हेल किलर चॅलेंजची निर्मिती रूसचा सायकोलॉजीचा विद्यार्थी फिलिप बुदेकिनने तयार केला आहे. हा गेम तयार केल्यामुळे त्याला त्याच्याच युनिर्व्हसिटीतून काढण्यात आलं होतं. त्याचं असं म्हणणं होतं की, या गेमच्या मार्फत तो या सोसायटीला साफ करून टाकणार आहे. तो असं देखील म्हणतं असे की, समाजाला उपयुक्तत नसणारे लोकं काही कामाचे नाहीत. तसेच हल्ली आणखी एका १७ वर्षाच्या मुलीला देखील पकडण्यात आलं आहे जिला या खेळांची "मास्टर माईंड" म्हणून ओळखण्यात येत आहे. सुरूवातीला ही मुलगी या खेळाची पार्टिसिपेंट होती. तिच्यावर आता आरोप आहे की तिने ५० चॅलेंज वाढवले आहेत. 


का पडलं हेच नाव? 


या गेमला ब्लू व्हेल गेम हे नाव यामुळे पडलं कारण की ब्लू व्हेल माशाची प्रवृत्ती अशी असते की, ती स्वतः पाण्यापासून स्वतःला दूर करते आणि स्वेच्छेन मरून जाते. आणि या गेमचा शेवट देखील असाच आहे स्वच्छेने मरण स्विकारलं जातं त्यामुळे या गेमचं नाव असं ठेवण्यात आलं आहे. 


कुठे झाली याची सुरूवात 


हा गेम सर्वात प्रथम रूसमध्ये खेळला गेला असून आता तो जगभरात पसरला आहे. हा गेम मोकळ्या जागी खेळला जात नाही आणि त्याला डाऊनलोड देखील केला जात नाही. नाही याचं कोणतं अॅप आहे आणि सॉफ्टवेअर आहे. हा सोशल मीडिया नेटवर्कच्या ग्रुप्समधून लपून छपून खेळला जातो. या खेळाला खेळण्यात कुणाचीही मर्जी लागत नाही. क्रिएटर स्वतः तुम्हाला शोधतात आणि खेळण्यासाठी इनवेटेशन पाठवतात. 


असा खेळला जातो हा गेम? 


ऑनलाइन अॅडमिनिस्ट्रेटर खेळणाऱ्याला ५० दिवसांचं चॅलेंज देण्यात येतं. प्रत्येक टास्क पूर्ण झाल्यावर प्लेअरला एक फोटो पाठवावा लागतो. सुरूवातीचे चॅलेंज सोपे असतात मात्र पुढे जाता जाता हे टास्क खतरनाक होत जातात. ज्यामध्ये स्वतःला नुकसान करण्याचे चॅलेंज आहे. हा खेळ तुम्हाला हळूहळू सुसाईडकडे घेऊन जातो. या अशा टास्कना कसं समोर आणावं तसं क्यूरेटर करू शकतो. 


कोण कोणते आहेत टास्क 



हे ५० चॅलेंज काय असतील हे तुम्हाला माहित नाहीत. मात्र खाली देण्यात आलेल्या यादीनुसार हे ते टास्क आहेत जे दिले जातात. ही लिस्ट कुणी तरी रेडिटवर शेअर केली होती. तसेच खेळाडू कुठून आहे यावर त्याचा टास्क आधारित आहे. तसेच स्त्री - पुरूषांना वेगवेगळे टास्क आहेत. 


१) आपल्या हातावर ब्लेडने 'F57' (रूसच्या डेथ एंड सुसाइड ग्रुपचे नाव) लिहावे 
२) सकाळी ४.२० ला उठून खतरनाक, भितीदायक असे व्हिडिओ बघावे
३) आपल्या हातावर असलेल्या नसेवर ३ छोटे कट करावेत 
४) पेपरवर व्हेल मासा काढून त्याला आपल्या हातावर ब्लेडने ट्रेस करावे
५) जर तुम्हील व्हेल बनायला तयार आहात तर पायावर ब्लेडने 'yes' लिहा आणि जर तसे नसेल तर तुम्ही स्वतःला शिक्षा म्हणून चावा
६) प्रत्येक टास्क हा कोडमध्ये असेल. 
७) तसेच दुसऱ्यांदा आपल्या हातावर ब्लेडने 'F40' असे टाईप करा. 
८) आपल्या स्टेटसमध्ये #I_am_Whale लिहा 
९) तुम्हाला तुमच्या भीतीवर मात करायला हवी 
१०) सकाळी ४.२० ला उठून टेरेवर जा
११) आपल्या हातावर कोरून व्हेल लिहा 
१२) पूर्ण दिवस बसून घाबरणारे व्हिडिओ पाहा 
१३) जे म्युझिक तुम्हाला अॅडमिनने पाठवले आहे ते सतत ऐका 
१४) आपल्या ओठ कापा 
१५) आपल्या हातावर सुया टोचा 
१६) स्वतःला त्रास द्या 
१७) सर्वात उंच जाऊन त्याच्या शेवटच्या टोकावर उभे राहा 
१८) कोणत्याही ब्रिजवर उभे राहा 
१९) कोणत्याही क्रेनवर चढून चालण्याचा प्रयत्न करा 
२०) क्यूरेटर चेक करणार की तुम्ही विश्वासाचे लायक आहेत की नाही 
२१) कोणत्याही व्यक्तीशी चॅट करा जो व्हेल गेमशी जोडला गेला आहे 
२२) छतावर शेवटच्या टोकावर उलटे होऊन बसा 
२३) कोडमध्ये आणखी एक टास्क मिळेल. 
२४) हा सिक्रेट टास्क असेल 
२५) कोणत्याही व्हेलला भेटा 
२६) क्यूरेटर तुम्हाला तुमच्या मृत्यूची तारीख सांगेल ती तुम्हाला ऐकावी लागेल 
२७) सकाळी ४.२० ला उठून आपल्या घराच्या शेजारील रेल्वे ट्रॅकवर जा. 
२८) कोणाशीही बोलू नका 
२९) शपथ घ्या तुम्ही एक व्हेल आहात 
३० ते ४९ प्रत्येक दिवशी ४.२० ला सकाळी उठावे. भितीदायक व्हिडिओ पाहा. तसेच क्यूरेटरने पाठवलेले संगीत ऐका. 
५०) सगळ्यात उंच छतावरून उडी मारा.