मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहाता सर्वसामान्य जनतेसाठी लोकल सेवा बंद आहे. फक्त सरकारी कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू आहे. पण खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बससाठी तासोंतास रांगेत उभं राहावं लागत आहे. शिवाय प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. महत्त्वाचं म्हणजे लेकलने निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी एक तास लागत असेल तर बस आणि इतर वाहनांनी प्रवास करण्यासाठी दोन ते  तीन तास लागतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे झी 24 तासने ज्यांनी लस घेतली आहे, त्यांना लोकल मधून प्रवास करण्याची मुभा दिली पाहिजे ही मोहीम सुरू केली आहे.  झी 24 तासने हाती घेतलेल्या माहिमेचं नाव  'लसवंतांना परवानगी द्या!' असं आहे.  ज्यांनी लस घेतली आहे किमान त्यांना मुंबई आणि परिसरात लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी. कारण लोकल प्रवास फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी असल्याने बस वाहतुकीवर मोठा ताण आला आहे.



मुंबई आणि परिसरात लोकल हेच प्रवासाचे मुख्य साधन आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील लोकांनाचं लोकल प्रवासाला परवानगी आहे. यामुळे सर्वसामान्य नोकरदार, हातावर पोट असणाऱ्या लाखो लोकांना नोकरीच्या ठिकाणी पोहोचता येत नाही.  लोकांचे हाल होत आहेत, अनेकांचे रोजगार गेले आहेत, यामुळे घर चालवणे अशक्य झालं आहे. 


त्यामुले  बनावट ओळखपत्र तयार करत अनेकांचा नाईलाजाने का होईना लोकल प्रवास सुरु आहे. त्यामुळे ज्यांनी लस घेतली आहे, त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी. सर्वसामान्याचे होणारे हाल पाहाता झी 24 तासने ही मोहीम हाती घतेली आहे.