मुंबई : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अॅमेझॉनने नवी ऑफर आणलेय. ऑनलाईन खरेदी केल्यावर ग्राहकांना कॅशबॅक मिळणार आहे. ही कॅशबॅक ग्राहकांना पाच प्रकारे मिळू शकणार आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅमेझॉन ई-कॉमर्स कंपनी भारतातली पाचवी वर्षपूर्ती साजरी करत आहे. त्यानिमित्ताने ग्राहकांसाठी ऑफर ठेवली आहे.  गेल्या दोन वर्षात अॅमेझॉन खास शॉपिंग वेबसाईट बनली आहे. आपला हा आनंद ग्राहकांसोबत वाटून घेण्यासाठी अॅमेझॉनने ग्राहकांसाठी ही विशेष ऑफर आणली आहे. 


ग्राहकांने कमीत कमी एक हजार रुपयांची खरेदी केल्यास अॅमेझॉन २५० रुपयांची कॅशबॅक ऑफर देत आहे. अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझॉस यांनी एक पत्र लिहून ते वेबसाइटवर शेअर केलेय. अॅमेझॉनला भारतातील शॉपिंगची सर्वाधिक पसंतीची साइट बनवण्यासाठी त्यांनी ग्राहकांचे आभार मानले आहेत.  


काय आहे ऑफर? 


-  ग्राहकांनी अॅमेझॉनच्या साइटवर कमीत कमी एक हजार रुपयांची खरेदी केली पाहिजे. 
- क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेटबँकिंग आणि EMI, UPI च्या माध्यमातून पेमेंट केल्यास या योजनेचा लाभ मिळणार 
- ऑर्डर शिपमेंट झाल्यानंतर ३ दिवसांच्या आत २५० रुपये ग्राहकाच्या अॅमेझॉन पे अकाउंटवर जमा होणार आहेत. 
- ही ऑफर केवळ ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठीच आहे.