मुंबई  : न्यायालयात लढा सुरू असतानाच मनसेनं अॅमेझॉनविरोधात आक्रमक पवित्रा घेत कार्यालयांमध्ये तोडफोड सुरू केलीय. पुण्यामध्ये कोंढवा इथं ऑफिसची तोडफोड केल्यानंतर आता मुंबईतही साकिनाका इथल्या अॅमेझॉनच्या कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. साकीनाका मारवा इंडस्ट्रियल इस्टेट इथल्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मराठी भाषेला आपल्या वेबसाइटवर स्थान द्यावं, अशी मागणी मनसेने अँमेझॉनकडे केली होती. मात्र अॅमेझॉनकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, उलट हा वाद आता कोर्टात गेलाय. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी अॅमेझॉनच्या कार्यालयांवरच आपला मोर्चा वळवलाय.