COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : अमित शाह यांच्या मातोश्रीवारीचा आगामी विधानपरिषद निवडणुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधातच लढणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे.


उद्धव ठाकरेंंच्या भूमिकेकडे लक्ष 


4 विधानपरिषदच्या जागेवर विशेषतः मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधरमध्ये शिवसेना -  भाजपामध्ये थेट आणि मुख्य लढत होणार आहे. कोकण पदवीधरची जागा भाजपाची असून या ठिकाणी भाजपाबरोबर शिवसेनेनेही उमेदवार दिला आहे. तर मुंबई पदवीधरची जागा शिवसेनेची असून सेनेच्या उमेदवाराने अर्ज भरला आहे. पालघरच्या सभेत बुधवारच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे काय भूमिका काय जाहीर करतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.