मुंबईत अमित शाहांची बाबासाहेब - बाळासाहेबांना पुष्पांजली!
भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांचं तीन दिवसीय मुंबई दौऱ्यासाठी आज सकाळी १० वाजता विमानतळावर आगमन झालं.
मुंबई : भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांचं तीन दिवसीय मुंबई दौऱ्यासाठी आज सकाळी १० वाजता विमानतळावर आगमन झालं.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यानंतर दौऱ्याच्या पहिल्याच टप्प्यात अमित शाह शिवाज पार्कवर पोहचले. शिवाजी पार्कवर अमित शाहांनी शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली. तिथून अमित शाहा बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळी आदरांजली अर्पण केली. उल्लेखनीय म्हणजे, यावेळी शिवसेनेचा कोणताही नेता इथं उपस्थित नव्हता.
दादरमध्ये असणाऱ्या सावरकर स्मारकालाही अमित शाहांनी हजेरी लावली. सावरकारांच्या पुतळ्याला अमित शाहांनी पुष्पहार अर्पण केला. इथून जवळच्या डॉ. बाबासाहेब आंबेड़करांच्या स्मृतीस्थळी अर्थात चैत्यभूमीवर जाऊन अमित शाह नतमस्तक झाले. तिथून ते गरवारे क्लबमध्ये भरलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला रवाना झाले.