मुंबई : 'माझ्या आयुष्यातील मोठा दिवस आहे. याआधी जे प्रेम दिलं ते यापुढे ही द्याला अशी अपेक्षा व्यक्त करतो. अमित ठाकरे यांनी यावेळी मनसेकडून शिक्षण ठराव मांडला. यावेळी ठरावात त्यांनी म्हटलं की, 'लहान मुलांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याची गरज आहे. क्रीडा विद्यापीठाची निर्मिती होणं गरजेचं आहे.' अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड होत असताना त्यांचं कुटुंबिय भावनिक दिसत होती. यावेळी शर्मिला ठाकरे, राज ठाकरे यांच्या आई,  मिताली अमित ठाकरे, उर्वशी ठाकरे हे देखील उपस्थित आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरे यांची लक्षणीय उपस्थिती मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनात जाणवते आहे. अमित ठाकरे यांनी मनसेचा झेंडा हाती घेऊन आजपासून खऱ्याअर्थाने आपली राजकीय वाटचाल सुरू केली आहे. मनसेचा नवा झेंडा फडकावत अमित ठाकरेंनी आपला आनंद साजरा केला. अमित उत्साहाने आता पक्षाच्या कार्यासाठी पुढे होताना दिसत आहेत.



अमित ठाकरे यांची खऱ्या अर्थाने आता राजकारणात एन्ट्री झाली आहे. राजकारणात वेगवेगळ्या राजकीय घराण्यातील तरुण पिढी राजकारणात येत असताना अमित ठाकरे यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेशाबाबत देखील अनेकांमध्ये उत्सुकता होती. आज अखेर तो दिवस आला. अमित ठाकरे यांच्या पुढे अनेक राजकीय आव्हान असणार आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीपुढे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे.


आज मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राज्यव्यापी महाअधिवेशन पार पडत आहे. यावेळी मनसेचे सगळे नेते आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत.