मुंबई : राजकारणाच्या मैदानात नवे ठाकरे उतरले आहेत. अमित ठाकरेंचं नेते म्हणून लॉन्चिंग झालं. अमित ठाकरेंची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. आजोबांच्या जयंतीदिवशी नातवाचं रिलॉन्चिंग झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित यांची प्रोफाईल राज ठाकरेंसारखी मुळीच नाही. अमित मितभाषी आहेत. अमित ठाकरे २०१२ला पहिल्यांदा महापालिका निवडणुकीच्या प्रचारात दिसले होते. २०१४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रचारातही ते दिसले. पक्षाच्या बैठकांना ते उपस्थित असायचे. 


पर्यावरण, फुटबॉल आणि शिक्षण...अमित आणि आदित्य दोघांच्याही आवडीचे हे काही समान विषय... पर्यावरणाच्या मुद्द्यावर अमित ठाकरेंनी महापालिका अधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या. मधल्या काळात अमित ठाकरेंनी दुर्धर आजारावरही यशस्वी मात केली. आता नव्या इनिंगसाठी अमित ठाकरे सज्ज झाले आहेत.


'माझ्या आयुष्यातील मोठा दिवस आहे. याआधी जे प्रेम दिलं ते यापुढे ही द्याला अशी अपेक्षा व्यक्त करतो.' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी महाअधिवेशनात अमित ठाकरे यांनी मनसेकडून शिक्षण ठराव मांडला. यावेळी ठरावात त्यांनी 'लहान मुलांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याची गरज आहे. क्रीडा विद्यापीठाची निर्मिती होणं गरजेचं असल्याचं म्हटलं. अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड होत असताना त्यांचं कुटुंबिय भावनिक दिसत होती. यावेळी शर्मिला ठाकरे, राज ठाकरे यांच्या आई, मिताली अमित ठाकरे, उर्वशी ठाकरे हे देखील उपस्थित होते.


अमित ठाकरे यांची खऱ्या अर्थाने आता राजकारणात एन्ट्री झाली आहे. राजकारणात वेगवेगळ्या राजकीय घराण्यातील तरुण पिढी राजकारणात येत असताना अमित ठाकरे यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेशाबाबत देखील अनेकांमध्ये उत्सुकता होती. अखेर तो दिवस आला. अमित ठाकरे यांच्यापुढे अनेक राजकीय आव्हानं असणार आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीपुढे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे.