Maharashtra Bandh : अमृता फडणवीस यांनी विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर कोण देणार?
महाराष्ट्र बंदवरुन अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला जोरदार टोला लगावला आहे
मुंबई : उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Khiri Violence) घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारमधल्या तीनही पक्षांनी आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदवरुन अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर बोचरी टीका केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका करण्याची एकही संधी अमृता फडणवीस सोडत नाहीत.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. आज वसूली चालू आहे का बंद? असा सवाल अमृता फडणवीस यांनी ट्विट करत विचारला आहे. या ट्विटसोबत अमृता फडणवीस यांनी #MaharashtraBandhNahiHai हा हॅशटॅगही जोडला आहे.
याआधीही अमृता फडणवीस यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकारव टीका केली आहे. याआधी मुंबईत साचलेल्या पाण्यात उभं राहून अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं होतं. आणि यात त्यांनी म्हटलं होतं, 'या शहराच्या प्रत्येक वळणावर खड्डे सापडतील, पण शोधलं तर एक गुन्हेगारही सापडणार नाही'. या ट्विटच्या माध्यमातून अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला होता.