मुंबई : मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) एनसीबी (NCB), समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि भाजपवर  (BJP) सातत्याने आरोप करत आहेत. इतकंच नाही तर मलिक यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांचे ड्रग पेडलरशी संबंध असल्याचा दावा केला होता. तेव्हापासून मलिक विरुद्ध फडणवीस असा सामना रंगला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवरुन अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना अब्रु नुकसानीची नोटीस पाठवली आहे. नवाब मलिक ट्विटद्वारे गैरसमज पसरवणं आणि प्रतिमा मलिन करण्याचं काम करत असल्याने अमृता फडणवीस यांनी ही नोटीस पाठवली आहे. संबंधित प्रकरणात मलिका यांनी कायदेशीर उत्तर द्यावं अन्यथा अब्रुनूकसान म्हणून कारवाई केली जाईल असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे.


48 तासात मानहानीकारक, दिशाभूल करणारं ट्विट डिलिट करा आणि सार्वजनिकपणे माफी मागा अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा, मानहानीच्या खटल्यासोबतच फौजदारी कारवाईचाही इशारा नोटीसीतून देण्यात आला आहे. भादंवि कलम 499 आणि 500 अंतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. 



सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अमृता फडणवीस यांनी अलीकडंच मलिक यांच्यावर निशाणा साधला होता. बेनामी आणि काळी संपत्ती वाचवण्यासाठी नवाब मलिक लोकांवर आरोप करताहेत, असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या. 


नवाब मलिक यांचा आरोप


देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी (Amruta Fadnavis) नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा (Jaideep Rana) आहे. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत, असा दावा नवाब मलिकांनी केला आहे. यासंबंधीचा एक फोटोही नवाब मलिक यांनी ट्विटरवर शेअर केला होता.


देवेंद्र फडणवीस यांना नोटीस


नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक खान यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस काढली आहे. निलोफर यांचे पती आणि मलिकांचे जावई समीर खान यांच्या घरात ड्रग्ज सापडल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. हा आरोप चुकीचा असल्याचा दावा निलोफर यांनी केला आहे.