Mangal Prabhat Lodha On Amruta Fadanvis: राज्याचे उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या विविध सामाजिक कार्यांमध्ये सहभागी असतात. अनेक समाजपयोगी कामांमध्ये त्या पुढाकार घेतात. त्या आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. तसेच सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह असतात. अमृता फडणवीस यांना आता कोणी मॅडमऐवजी माँ म्हणून संबोधले तरी वावगे वाटायला नको. कारण मुंबई उपगनराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यापुढे त्यांचा माँ असा उल्लेख करणार आहेत. त्यांनीच यासंदर्भात घोषणा केली आहे. काय म्हणाले मंगल प्रभात? जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमृता फडणवीस यांच्या दिव्य फाउंडेशनच्यावतीने वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर साफसफाई करण्यात आली.यावेळी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे उपस्थित होते. यावेळी मंगल प्रभात लोढा यांनी आजपासून अमृता फडणवीस यांना मां असं संबोधणार असल्याचे म्हटले.


राज्यातील मुलामुलींसाठी त्या धावून आल्या आहेत. त्यामुळे आजपासून मी अमृता फडणवीस यांना माँ अस संबोधणार आहे, असं मंगल प्रभात लोढा म्हणाले. 



'राजकारणातील कचरा साफ करावा'


महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घाण झालेली आहे. हा कचरासुद्धा त्यांनी साफ करावा अशी विनंती मंगल प्रभात लोढा यांनी अमृता फडणवीस यांना केली.