मुंबई: अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. तुम्ही इतरांना मारझोड करून नेतृत्व करू शकत नाही. तो हल्ला असतो, नेतृत्व नव्हे, अशी बोचरी टीका अमृता फडणवीस यांनी केली. दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे!, असा शेरही त्यांनी या ट्विटमध्ये जोडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमृता फडणवीस यांनी रविवारी केलेल्या ट्विटमुळे या वादाला तोंड फुटले होते. केवळ ठाकरे आडनाव असून भागत नाही. त्यासाठी व्यक्तीला तत्वांचे प्रामाणिकपणे पालन आणि लोकांच्या कल्याणासाठी काम करावे लागते, असे त्यांनी म्हटले. अमृता फडणवीस यांच्या या ट्विटनंतर शिवसेनेतील नेते आक्रमक झाले होते. 


'सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथ पेशव्यांची बुद्धी भ्रष्ट केली'


शिवसेनेच्या महिला आघाडीने त्यांना निर्वाणीचा इशारा दिला होता. उद्या शिवेसनेची महिला आघाडी आक्रमक झाली तर मग देवेंद्र फडणवीसांनी मध्ये यायचे नाही. महाराष्ट्राला अमृता फडणवीस नाव हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर कळले. त्यापूर्वी अमृता फडणवीस यांच्याबद्दल कोणालाच माहिती नव्हती. याउलट ठाकरे घराण्यातील चार पिढ्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी आम्हाला सर्टिफिकेट देण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांनी आधी स्वत:चे घर सांभाळावे आणि मग आम्हाला सांगावे, असे शिवसेना नेत्या विशाखा राऊत यांनी म्हटले होते. या सगळ्या वादाविषयी देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनीही फार बोलण्यास नकार दिला होता. अमृता फडणवीस या स्वतंत्र व्यक्तीमत्व आहेत, एवढेच त्यांनी सांगितले होते. 



खबरदार! अमृता फडणवीसांना शिवसेनेच्या महिला आघाडीचा इशारा