मुंबई : महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis)  या कायमच चर्चेत असतात. कधी आपल्या गाण्यामुळे तर कधी आपल्या वक्तव्यामुळे. अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत ते आपल्या अर्थसंकल्पावरील ट्विटमुळे. सोमवारी देशाचा अर्थसंकल्प सादर झाला. यानंतर अमृता फडणवीसांनी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे त्या (Amruta Fadnavis Troll on Twitter)  ट्रोल होताना दिसत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा २०२१-२२ चा अर्थसंकल्प सोमवारी सादर केला. अम-ता फडणवीस यांनी ट्विट करून या संदर्भात ट्विट करून प्रतिक्रिया दिली. अमृता यांनी ट्विटमध्ये निर्मला सीतारमण यांच कौतुक केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की,'मागील १०० वर्षांमध्ये कधी पाहण्यात आलं नाही अशापद्धतीने अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल श्रीमती निर्मला सीतारामन यांचे आभार. कराचा बोजा सर्वसामान्यांवर न टाकता विकासाला प्रेरणा कशी द्यायची हे आता सर्व देश आपल्याकडून शिकतील,'असं अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. 



अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमुळे ट्विटरवर ट्रोल आहेत. अनेक ट्विट करत नेटकऱ्यांनी त्यांना स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली आहेत. तुम्ही १०० वर्षांचा दाखला कुठे देता? अशी टीका केली आहे.



  


त्यांनी केलेल्या या ट्विटमुळे त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे. ७३ वर्षे झाली आहेत. आणि तुम्ही १०० वर्षांतील कोणते बजेट पाहिले आहेत? असा सवालही विचारला जात आहे.