Anant Radhika Engagement Dance Video: रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या धाकटे चिरंजिव अनंत (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट  (Radhika Marchant) यांचा साखरपुडा गुरुवारी मोठ्या थाट्यात पार पडला. मुंबईतील अंबानी यांचं निवासस्थान एंटिलिया एका नवरीसारखं नटलं होतं. याच ठिकाणी गुजराथी पंरपरेनुसार अनंत आणि राधिका यांचा गोल-धना आणि चुनरीची रस्म करण्यात आली. या विधीनंतर अंबानी कुटुंबातील सदस्यांनी धम्माल डान्स करून नवरा मुलगा अनंत आणि नवरी मुलगी राधिकाला खास सरप्राइज दिलं. 


 वाह वाह रामजी जोडी क्या बनाई...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सोहळ्यात अख्ख अंबानी कुटुंब खूप आनंदात दिसतं होतं. मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेकाचा साखरपुडा असल्याने घरात एकच जल्लोष आहे. नवरी राधिका मर्चंट अंबानी यांच्या घरी आली. त्यामुळे तिच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. नवरदेव अनंत आणि नवरी राधिकासाठी मुकेश अंबानी, नीता अंबानी, थोरला मुलगा आकाश, थोरली सून श्लोका, मुलगी ईशा आणि जावई आनंद पिरामल यांनी खास डान्स केला. 'हम आप के है कौन' या सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या 'वाह वाह रामजी जोडी क्या बनाई' या गाण्यावर त्यांनी डान्स केला. (Anant ambani Radhika Merchant engagement Mukesh Ambani Nita Ambani Surprise dance performance VIDEO mumbai in marathi news)



असा झाला सोहळा 


राधिका मर्चंट यांचं अंबानी यांच्या घरात मंत्रोच्चार करुन स्वागत करण्यात आलं. यानंतर दोन्ही कुटुंबांनी मंदिरात जाऊन भगवान कृष्णाचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर गणेश वंदना संपन्न झाली. विधीनुसार अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची पत्रिका वाचण्यात आली. त्यानंतर गोल धाना आणि चुनरी विधी पार पडला.