COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : विधानपरिषदेच्या  मुंबई, कोणक पदवीधर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत मुंबईतल्या  शिवसेना भवनात बैठक झाली. या बैठकीला कोकणातील सर्व मंत्री आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुकीतल्या रणनितीसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.


मुंबई पदवीधर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनाच चौथ्यांदा उमेदवारी देणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार याबाबत मात्र आजच्या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही. कोकण पदवीधर मतदार संघासाठी ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांचे नाव उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी बैठकीत जाहीर केली आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघ मध्ये शिवाजी शेंडगे यांचे नाव आधीच जाहीर करण्यात आलं आहे