Ananya Sanman Winner 2023 : अनन्य सन्मान 2023... 'झी 24 तास अनन्य सन्मान' सोहळ्याचे हे चौदावे वर्ष आहे. सामाजिक बांधिलकी जपत प्रेरणादायी वाटचाल करणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना शुक्रवारी 'झी 24 तास अनन्य सन्मान' देऊन गौरवण्यात आले. यंदा समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये अनन्य साधारण योगदान देणाऱ्या विभूतींचा 'झी 24 तास अनन्य सन्मान' हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. यंदाचा अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्राचे रानकवी अशी ओळख असलेले ज्येष्ठ कवीवर्य आणि गीतकार ना. धों. महानोर यांना देऊन गौरवण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा सोहळा  'झी 24 तास'वर आज 22 एप्रिल 2023 रोजी रात्री 9.00 वाजल्यापासून दाखविण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांना 'अनन्य जीवनगौरव' पुरस्कार प्रदान


राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, न्या. सत्यरंजन धर्माधिकारी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर  यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते झी 24 तास अनन्य सन्मान प्रदान करण्यात आला. या हृदयस्पर्शी सोहळ्यातील क्षण आणि पुरस्कार वितरण सत्कार सोहळा 'झी 24 तास'वर दाखविण्यात येणार आहे. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये रंगलेल्या सोहळा आज घरबसल्या पाहता येणार आहे. त्यामुळे या सोहळ्याची रात्री 9.00 वाजताची वेळ चूकवू नका आणि या सोहळ्याचा आनंद लुटा.



मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'झी 24 तास'च्या अनन्य सन्मानच्या मंचावरुन सोनाली हिने या सिनेमातील पहिल्या गाण्यावर परफॉर्मन्स सादर केला. तिने उपस्थित असलेल्या प्रत्येकाचीच मने जिंकली आहेत. 'झी 24 तास अनन्य सन्मान' सोहळ्यात आपल्याला सोनालीचा दमदार परफॉर्मन्स आज तुम्हाला पाहता येणार आहे. या सिनेमात सोनालीचा लूक ते तिचे दमदार डायलॉग्स पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत. 


हे आहेत सत्कारमूर्ती


महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असलेले ख्यातनाम राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक चंद्रकांत इलग, सातारामधील माण तालुक्यातील बहिण-भाऊ यांनी गावच्या माळरानावर चक्क वनराई फुललीय. ते दोघे रक्षिता आणि रोहित बनसोडे, मालेगावात शेती महामंडळाच्या 400 एकर जागेवर नंदनवन फुलवणारे शिवाजी डोळे, विधवा प्रथेला कायमची मूठमाती देण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचा सन्मान, गेल्या 10 वर्षांपासून कुणाच्याही मदतीशिवाय सांस्कृतिक चळवळ सक्रीय ठेवणारी समता विचार प्रसारक संस्था, पुण्यातल्या फुटपाथवरच्या बेघर मुलांसाठी फूटपाथ शाळा सुरु करणाऱ्या अमित ऊर्फ आम्रपाली मोहिते, नवे मराठी उद्योजक घडवण्याचा वसा घेतलेले आनंद देशपांडे, अनोखं शौर्य गाजवणाऱ्या सुप्रिया किंद्रे आणि अवघं जीवन कलेसाठी समर्पित करणाऱ्या कमलबाई शिंदे या मुरळी यांचा सन्मान करण्यात आला.