अंधेरीत पुलाचा भाग कोसळला, पाहा LIVE अपडेट
पूल कोसळण्याच्या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.
मुंबई : मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, या दरम्यान आज सकाळी अंधेरी रेल्वे स्टेशनवरून पश्चिम आणि पूर्वेकडे जाण्यासाठी जो रस्ता वाहतुकीचा पूल आहे, त्या पुलाचा पादचाऱ्यांना चालण्यासाठी, फुटपाथसारखा असलेला पुलाचा भाग कोसळला आहे. यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक अनिश्चित काळासाठी ठप्प झाली आहे. पूल कोसळण्याच्या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. अग्निशमन दल, एनडीआरएफची टीम घटनास्ळी पोहोचलेली आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जो़डणारा हा पूल कोसळला आहे. गोरेगाव ते वांद्रे दरम्यानची पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे.
वांद्रे ते चर्चगेट लोकल वाहतूक मात्र सुरू आहे, तसेच गोरेगाव ते विरार वाहतूक देखील सुरू असल्याचं पश्चिम रेल्वेने कळवलं आहे. पश्चिम रेल्वेच्या भागातील डब्बेवाल्यांची सेवा देखील आज बंद आहे. वाहतूक पूर्ववत होण्यास आणखी ४ तास लागणार आहेत. गोखले पुलाचा
अंधेरीत सकाळीच हा पुलाचा भाग कोसळल्याने लोकल प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रेल्वेने पावसाळ्याआधी या पुलाची पाहणी केली होती किंवा नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.