मुंबई : राजकीय वर्तुळातून (Political News) एक मोठी बातमी आली आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे (Ramesh Latke Death) अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (Andheri By Election 2022)  लागली आहे. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्यात आली आहे. मात्र ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात आलीय. (andheri bye election 2022 mahavikas aghadi candidate rutuja latke resign her bmc job but till not acepted)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत कार्यरत होत्या. मात्र पोटनिवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामा दिला. मात्र अजूनही त्यांचा राजीनामा स्वीकार करण्यात आलेला नाही. ऋुतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकार होत नसल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्यांची धावाधाव सुरू झालीय. 


ऋतुजा लटके यांनी नियमांनुसार निवडणूक लढवण्यासाठी  महिन्याभरापूर्वी आपल्या सेवेचा राजीनामा दिलाय. मात्र महापालिका प्रशासनान राजीनामा अद्याप मंजूर केलेला नाही. जोपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत त्या विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज भरू शकत नाही. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची 14 ऑक्टोबर आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाकडे शेवटचे 3 दिवस राहिले आहेत. 


पोटनिवडणुकीसाठी दुहेरी लढत 


या पोटनिवडणुकीसाठी दुहेरी लढत पहायला मिळणार आहे. भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर ऋुतुजा लटके या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. या व्यतिरिक्त इतर कोणीही अजूनही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे सध्या तरी या पोटनिवडणुकीत दुहेरी लढत पहायला मिळणार आहे. 


चिन्ह जाहीर 


दरम्यान निवडणूक आयोगाने ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला या पोटनिवडणुकीसाठी पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं आहे.