Narayan Rane on Ramesh Latke : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीकडे (Andheri East Bypoll) सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या मृत्यूनंतर अंधेरीची पोटनिवडणूक पार पडत आहे. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना महाविकास आघाडीकडून (MVA) उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज देखील दाखल केलाय. तर दुसरीकडे भाजपकडून (BJP) मुरजी पटेल (Murji Patel) यांनी देखील जोरदार तयारी केली आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मोठं वक्तव्य केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची (Andheri Bypoll) धामधूम सुरू असतानाच नारायण राणे यांच्या वक्तव्याने राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. रमेश लटके जिवंत असते तर ते शिंदे गटात असले असते, असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे. राणे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा होताना दिसत आहे. त्यावेळी त्यांनी ठाकरे गटाला देखील खडे बोल सुनावले आहेत.


भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी नारायण राणे यांनी हे वक्तव्य केलंय. उद्धव ठाकरेंकडे आता काहीही राहिले नाही. राज्य गेलं, मुंबई देखील गेली. त्यामुळे दक्षिण मुंबईत भाजपचाच खासदार असणार आहे, असंही नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले आहेत.


आणखी वाचा- Rutuja Latke : अखेर ऋतुजा लटके यांचा राजीनामा BMC कडून मंजूर, निवडणुकीचा मार्ग मोकळा 


दरम्यान, मुंबईत एकही खासदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा येणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ, असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना खुल्ल चॅलेंज दिलंय. त्याचबरोबर अंधेरीची निवडणूक (Andheri Bypoll) आम्हीच जिंकणार, असंही राणे म्हणाले. अंधेरी पोटनिवडणुकीत नारायण राणे यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे. त्यामुळे आता निवडणूक प्रचार आणखी रंगदार होणार असल्याचं चित्र आहे.