Andheri East Assembly Constituency Bye Election : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे विरुद्ध भाजप सामना
शिवसेना (ShivSena) आमदार रमेश लटके (Late Ramesh Latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ (Andheri East Assembly Constituency Bye Election) रिक्त आहे.
मुंबई : शिवसेना (ShivSena) आमदार रमेश लटके (Late Ramesh Latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ (Andheri East Assembly Constituency Bye Election) रिक्त आहे. या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. या रिक्त जागेसाठी एकनाथ शिंदे गटाकडून (Eknath Shinde) दावा करण्यात आला होता. शिंदे गट या जागेसाठी आग्रही होती. मात्र या मतदारसंघातून भाजप (Bjp) आपला उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. (andheri east assembly constituency bye election bjp murji patel vs uddhav thakceray group rutuja latke who will win)
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक भाजप लढवणार आहे. ठाकरे गटानं लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिंदेंनी ही जागा भाजपला सोडलीय. त्यामुळे आता अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे विरुद्ध भाजप (Thackeray VS Bjp) सामना होणारंय. भाजपकडून मुरजी पटेल (Murji Patel) यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यामुळे आता ही पोटनिवडणूक शिवसेना विरुद्ध भाजप अशी होणार आहे.
कोण आहेत मुरजी पटेल? (Who is Murji Patel)
पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक राहिले आहेत. पटेल 2019 मध्ये लटके यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
राज्यात 2019 मध्ये शिवसेना-भाजप यूती जाहीर झाली होती. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभेची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. त्यामुळे पटेल यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती.
या निवडणुकीत रमेश लटके यांनी पटेल यांचा 16 हजार 965 इतक्या मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. मात्र उल्लेखनीय बाब अशी की अपक्ष निवडणूक लढवूनही पटेल यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती. पटेल यांना 45 हजार 808 मतं मिळाली होती.
पटेल 'जीवन ज्योत प्रतिष्ठान' या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून घराघरात पोहचले आहेत. त्यांची आपल्या भागावर घट्ट अशी पकड आहे. त्यांना मानणारा आणि जाणणारा असा एक वर्ग आहे.