राज्यातील अंगणवाडी सेविकांमध्ये असंतोष
राज्यातील अंगणवाडी सेविकांमध्ये असंतोष पसरला आहे.
मुंबई : राज्य सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे निवृत्ती वय, अचानकपणे 65 वर्षावरून 60 वर्षावर करण्याचा निर्णय, 23 फेब्रुवारी 2018 च्या परिपत्रकानुसार घेतला आहे. त्यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविकांमध्ये असंतोष पसरला आहे.
अंगणवाडी सेविकांचं एक महिना कामबंद आंदोलन
मागील वर्षी 11 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील अंगणवाडी सेविकांनी एक महिना कामबंद आंदोलन केलं होतं. त्याचवेळेस राज्य सरकारने महिला आणि बालकल्याण विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मानधनवाढ समिती गठित केली होती.
मानधनात अद्यापही वाढ नाही
समितीच्या शिफारशीनुसार सेवाज्येष्ठता प्रमाणे मानधनात वाढ देण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. वाढीव मानधन अजून मिळालेच नाही, मात्र सेवा समाप्तीचे वय हे 65 वर्षावरून 60 वर्ष केल्यामुळे, अंगणवाडी सेविका संघटना पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
सरकारच्या विरोधात अंगणवाडी सेविकांची निदर्शने
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात अंगणवाडी सेविकांनी निदर्शने केली आणि सरकारने नवीन काढलेला सेवा समाप्तीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली.