मुंबई : दाक्षिणात्य सिनेमाची कॉपी करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं. त्याने ड्रग्स तस्करीसाठी जो मार्ग निवडला तो भयंकर होताच पण त्यामुळे त्याचाही जीव धोक्यात आला असता. एवढंच नाही तर इतका खटाटोप करून या तरुणाचा बिंग फुटलं ते वेगळंच. या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर जे सत्य समोर आलं ते पाहून अधिकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेरॉईन तस्करीप्रकरणी अंगोलाच्या एका नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. आरोपीनं पोटात हेरॉइन लपवून तस्करी करत होता. आरोपीकडून दीड किलो हेरॉईन ताब्यात घेतले आहेत. 


जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत 10.45 कोटी असल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरोपीला अटक करण्यात आली.


कस्टम विभागाने एअर इंटेलिजेंस युनिटने 31 जुलै रोजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रग्सच्या तस्करीप्रकरणी एकाला ताब्यात घेतलं होतं. आता पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली. 


धक्कादायक बाब म्हणजे, या आरोपीनं ड्रग्सचे कॅप्सूल आपल्या पोटात लपवले होते. हा आरोपी 20 ते 25 तास टॉयलेटलाच गेला नाही. त्यामुळे त्याच्या पोटात जास्त दुखत होतं. त्याला त्रास होत होता. मात्र काहीही करून हे ड्रग्स पोहोचवायचे असल्याने तो सगळं सहन करत होता. मात्र त्याचं बिंग फुटलं आणि त्याला अटक करण्यात आली. 


आरोपीला रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं. त्याच्या पोटातून 127 कॅप्सूल काढण्यात आल्या. काढलेल्या कॅप्सूलमधील पांढरी पावडर हेरॉईन असल्याची माहिती मिळाली आहे. 


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने सांगितलं की पोटात कॅप्सूल टाकून ड्रग्जची तस्करी करणे धोकादायक आहे आणि त्यामुळे त्याचा जीवही जाऊ शकतो हे त्याला माहीत होते. मात्र आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ते त्याने हा धोका पत्करला.