मुंबई : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी कफल्लक झालेत. त्यांचं नाव धनाड्य उमेदवारांच्या यादीतून वगळण्यात आलंय. अनिल अंबानींच्या वकिलांनी ब्रिटनच्या कोर्टात तशी माहिती दिलीये. आरकॉम कंपनीतील तोट्याचा फटका अनिल अंबानींना बसलाय. चीनमधील अग्रगण्य बँकांनी अनिल अंबानी यांच्याकडून ६८० दशलक्ष डॉलर रक्कम वसूल करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली असून त्याबाबतच्या सुनावणीच्या वेळी वकिलांनी वरील बाब न्यायालयात स्पष्ट केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे एकेकाळी धनाड्य उद्योगपती असलेल्या अनिल अंबानी यांना धनाड्य उमेदवारांच्या यादीतून वगळण्यात आले आहे.  भारतातील दूरसंचार बाजारपेठेत अनर्थपूर्ण घडामोडी घडल्याने अंबानी आता धनाढय़ नाहीत, असं स्पष्टीकरण खुद्द त्यांच्या वकिलांनी दिलं आहे. 


९२५  दशलक्ष डॉलरच्या कर्जाला अनिल अंबानी यांनी २०१२ मध्ये वैयक्तिक हमी दिली होती. यासंदर्भातील तपशील देण्याची  मागणी दी इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड कमर्शिअल बँक ऑफ चायना लि., मुंबई शाखा, चायना डेव्हलपमेण्ट बँक आणि एग्झिम बँक ऑफ चायना यांनी केली आहे.