अनिल देशमुख यांना जामीन मंजूर पण 10 मिनिटांतच दिली स्थगिती; कोर्टात नेमक काय घडलं?
अनिल देशमुख यांच्या जामिनाच्या निर्णयाला उच्च न्यायालयाकडून 10 दिवसांची स्थगिती देण्यात आलीय
Anil Deshmukh Bail : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात सीबीआय तपास करत होती. गेल्या महिन्यात विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आता न्यायालयाने देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे.
मात्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर या जामीनाविरोधात सीबीआय सुप्रीम कोर्टात जाणार आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने देशमुख यांच्या जामिनाला विरोध करण्यासाठी 8 दिवसांची मुदत द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती दिली आहे.
त्यामुळे आता देशमुख यांच्या जामिनावर 10 दिवसांनी पुन्हा निर्णय दिला जाणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या अनिल देशमुख हे जसलोक रुग्णालयात उपचार घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांना याच प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मिळाला होता.
गेल्या महिन्यात विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी वैद्यकीय कारणास्तव जामीन मागितला होता. त्यानंतर आता अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणात अखेर जामीन मिळाला आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर अनिल देशमुख गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून तुरुंगात होते. या वर्षी एप्रिलमध्ये त्यांना सीबीआयने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली होती.