मुंबई : Anil Deshmukh case: Sachin Waze witnesses apology :बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयता अर्ज दिला आहे. 100 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh case) यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध माफीचा साक्षीदार होण्यास वाझे तयार झाला आहे. सीबीआयने त्याच्या अर्जाला अटींसह होकार दिला आहे. 30 मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार असून, सचिन वाझे हा माफीचा साक्षीदार होणार का, हे समजणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल देशमुख प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. सचिन वाझे यांने आरोपींविरोधात आपल्याकडे असणारी सर्व माहिती देण्याची तयारी दर्शवली आहे. यात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही समावेश आहे.


आता सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार होण्यासाठी सर्व तरतुदी तसेच कायदेशीर अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. माफीचा साक्षीदार  झाल्यानंतर या प्रकरणात नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. न्यायालयाने  सचिन वाझे याची याचिका स्वीकारल्यास त्याची साक्ष फिर्यादी साक्षीदार म्हणून नोंदवली जाईल. तसेच पुरावे इतर आरोपींविरुद्ध वापरले जाऊ शकतात. 


सचिन वाझे याने सक्तवसुली संचालनायकडेही (ED) अशीच विनंती केली होती. ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.