मुंबई : महाराष्ट्राच्या जनतेने इतिहासातील 'राजकीय भूकंप' 23 नोव्हेंबर 2019 रोजी अनुभवला. राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट फुटल्याचं म्हटलं गेलं. यावेळी 12 आमदारांपैकी अगदी शेवटपर्यंत अजित पवारांसोबत राहिलेले आमदार म्हणजे पिंपरी मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे. हे बनसोडे अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर थेट विधानभवनात शपथ घेताना दिसले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकीय भूकंपानंतर 12 आमदारांसह अण्णा बनसोडेदेखील गायब असल्याच म्हटलं गेलं. हे आमदार आज विधानभवनात शपथविधी घेताना दिसले. शपथविधी घेतल्यानंतर बनसोडेंनी 'जय राष्ट्रवादी'अशी घोषणा न देता,'जय हिंद, जय महाराष्ट्र' अशी घोषणा दिली. त्यांची ही घोषणा शिवसेनेच्या थाटातील नारा असल्याचं समजलं गेलं. 


अगदी 78 तासांचे उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांचे समर्थक म्हणून अण्णा बनसोडे ओळखले जातात. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आमदार अण्णा बनसोडे आणि त्यांचे कुटुंबीय नॉट रिचेबल होते. पण आता गायब झालेले बनसोडे थेट शपथ घेताना पहिल्यांदाच विधीमंडळात दिसले. 



भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी अजित पवारांना बनसोडेंचा शेवटपर्यंत पाठींबा होता. दिल्लीतून 3 आमदार परतले तरी बनसोडे अजित पवारांसोबतच होते. 2008 मध्ये हवेली विधानसभा मतदारसंघाचे विभाजन झाले आणि त्यातून पिंपरी मतदारसंघ अस्तित्वात आला. 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने अण्णा बनसोडेंना उमेदवारी दिली. त्यावेळी ते निवडून आले. पण 2014मध्ये त्यांचा पराभूत झाला. 2019 मध्ये नव्याने 'आपला कामाचा माणूस' असा प्रचार करत आमदार झाले. अण्णा बनसोडे तीन वेळा नगरसेवक राहिले असून स्थायी समितीचे सदस्य व अध्यक्षपदही भूषविले आहे.