Ration Card News : शिधापत्रिका धारकांसाठी (Ration Card) एक चांगली बातमी आहे. यावेळी दिवाळी (Diwali 2022) केंद्राव्यतिरिक्त राज्य सरकारकडून कार्डधारकांना मोठी भेट दिली जात आहे. देशभरात वाढलेली महागाई (Dearness) लक्षात घेता सरकारने साखरेच्या दरात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे तुम्हाला साखरेसाठी फक्त 20 रुपये खर्च करावे लागतील. (antyodaya ration card holders will get 1 kilo sugar only 20 rupees on occasion of diwali)


20 रुपयात साखर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रशासनाकडून साखरेचे दर कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता फक्त 20 रुपये किलो दराने रेशन दुकानातून साखर मिळेल. अंत्योदय कार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे. रेशन दुकानातून गहू, तांदूळ, डाळी आणि साखर यांसह अनेक वस्तू दिल्या जातात


दरम्यान महाराष्ट्र सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत दिवाळी किट देण्याचा निर्णय घेतलाय. या 100 रुपयांच्या किटमध्ये प्रत्येकी 1 किलो रवा, शेंगदाणे, खाद्यतेल आणि पिवळी मसूर डाळ देण्यात येणार आहे.