Lata Mangeshkar Health Update | लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट
गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत दिवसेंदिवस आणखी चांगली होत आहे. लता मंगेशकर यांना कोरोना झाल्याने 9 जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकरांचं वय आणि वाढत्या वयासह होणाऱ्या व्याधी पाहता त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं. लता मंगशेकर यांच्या प्रवक्ता अनुषा श्रीनिवासन अय्यरने त्यांच्या आरोग्याबाबत माहिती दिली आहे. (anusha iyer given health update of senior singer bharat ratna lata mangeshkar)
"लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्लानंतरच त्या घरी जाऊ शकतील. काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर नसल्याचं म्हंटलं जात होतं. मात्र ते वृत्त खोटं होतं. लतादीदींची प्रकृती ठिक आहे", असं अनुषा श्रीनिवासन सांगितलं.
"वैद्यकीय पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. त्या लवकरात लवकर बऱ्या होऊन घरी परताव्यात यासाठी तुम्ही प्रार्थना करा", असं आवाहनही अनुषा श्रीनिवासन यांनी केलं.
डिस्चार्ज केव्हा मिळणार?
लता मंगेशकर यांना आणखी 4-5 दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. त्यांचं वय पाहता त्यांच्यावर आयसीयूत वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहेत. मात्र त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज केव्हा मिळणार, हे अजूनही निश्चित नाही.