मुंबई : महाराष्ट्रात भाजपची (Bjp Maharashtra) नवी कार्यकारणी जाहीर झाली आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तार झाल्याने (Maharashtra Cabinet Expansion) भाजपमधील अनुभवी नेत्यांना नवी जबाबदारी देण्यात आली आहे. विधानपरिषदचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे ( chandrashekhar bawankule) आणि विधानसभा आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांना नवी जबाबदारी मिळाली आहे. (appointment of chandrashekhar bawankule as bjp state president and ashish shelar as mumbai president)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य मंत्रिमंडळाचा काही दिवसांपूर्वी शपथविधी पार पडला. यामध्ये मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष असलेले मंगलप्रभात लोढा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागली. त्यामुळे आता मुंबई प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड करण्यात आली आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत.


शेलारांकडे मोठी जबाबदारी


अवघ्या काही महिन्यांवर मुंबई महापालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेलारांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.


गत पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यात फक्त 2 जागांचा फरक होता. यंदा भाजपचं मिशन मुंबई आहे. त्यामुळे शेलारांसमोर भाजपचं मिशन मुंबई यशस्वी करण्याचं आव्हान असणार आहे.