दीपक भातुसे, मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल केंद्र सरकारच्या सेवेत जाणार आहेत. सुबोध जयस्वाल यांची केंद्रीय औद्यागिक सुरक्षा बलाच्या (CISF) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुबोध जयस्वाल यांनी केंद्रीय सेवेत जाण्यासाठी अर्ज केला होता. आता राज्याचे नवे पोलीस महासंचालक कोण होणार याची चर्चा रंगली आहे. सुबोध जयस्वाल हे १९८५ बॅचचे IPS अधिकारी आहेत.


सुबोध जयस्वाल यांची केंद्रात नियुक्तीनंतर आता बिपीन बिहारी, संजय पांडे, हेमंत नगराळे,  परमबिर सिंह यांची नावे नव्या पोलीस महासंचालकांच्या पदाच्या शर्यतीत आहेत.