Shakti Act : महिला आणि मुलांवरील अत्याचारासंदर्भात शक्ती कायदा मंजूर
महिला आणि मुलांवर अत्याचारासंदर्भात शक्ती कायदा मंजूर करण्यात आलाय.
मुंबई : महिला आणि मुलांवर अत्याचारासंदर्भात शक्ती कायदा मंजूर करण्यात आलाय. हा प्रस्ताव आता विधानसभेत मंजूर होवून तो केंद्र सरकारकडे मंजुरीला जाईल. तसेच बलात्कार करणाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा होईल अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. शक्ती कायद्याअंतर्गत महिलांवर होणारे अत्याचारावर कड़क कारवाई होईल. केवळ बोलत नाही तर सरकारने कृतीतून दाखवलं असल्याचे यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय.
छळ आणि एसिड हल्ला करणाऱ्यांवरही कारवाई होईल. एक क्रांतीकारी पाऊल सरकार ने टाकल्याचे सतेज पाटील म्हणाले. या प्रकरणांमध्ये १५ दिवसांत तपास होईल. चार्जशीटही लवकर दाखल होईल तसेच प्रत्येक जिल्ह्यात स्पेशल कोर्ट होईल असेही ते म्हणाले.