Maharashtra Politics : बाळासाहेब ठाकरे-शरद पवार, विलासराव देशमुख-गोपीनाथ मुंडे- शरद पवार.. कलगीतुरा महाराष्ट्रानं पाहिले.. मात्र कधीही या नेत्यांनी एकमेकांबद्दल ना शिवराळ भाषा वापरली ना एकमेकांवर व्यक्तिगत टीका केली. उलट पराकोटीचं राजकीय वैर असतानाही या नेत्यांनी कौटुंबिक संबंध जपले. मात्र ऐकणा-याला लाज वाटेल अशी शिवराळ भाषा महाराष्ट्राच्या राजकारणात वापरली जाऊ लागलीय. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि राणेंच्या (Rane)वादात अशीच शिवराळ भाषा पहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्त्यावरच्या भांडणात जसे अपशब्द वापरले  जातात त्या पद्धतीनं नेते एकमेकांबद्दल शिवराळ भाषा वापरायला लागलेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) विरुद्ध राणे (Rane) या वादानं तर लाजेचा परमोच्च बिंदू गाठलाय. याची सुरुवात झाली ती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंविरोधात वापरलेल्या शिवराळ भाषेने. 


नारायण राणेंबद्दल राऊतांनी शिवराळ भाषा वापरली ज्यानंतर त्यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे चांगलेच चिडले. ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत त्यांनीही तशाच पद्धतीनं अपशब्द वापरले. राणे-शिवसेना वाद दशकभरापेक्षा जुना आहे पण इतक्या खालच्या पातळीवर हा वाद कधीच पोहचला नव्हता.



महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. पराकोटीचे राजकीय मतभेद असतानाही व्यक्तिगत-खासगी टीकाटीपणी करायची नाही उलट कौटुंबिक संबंध जोपासायचे असा अलिखित नियम आजवर पाळला गेलाय. पण कुठेतरी या परंपरेला तडा गेलाय असं खेदानं म्हणावस वाटतं. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही देशात आदर्श मानली जाते. तिचा तोच पुरोगामी चेहरा कायम राहावा यासाठी आपण मतदारांनी योग्य प्रयत्न करायला हवे.