मुंबई :आधार नसल्याने एका वीरपत्नीला हरयाणातील रुग्णालयाने उपचार नाकारल्याने तीला जीव गमवावा लागल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यापूर्वीही 'आधार' अभावी रेशनवरील धान्य रोखलं आणि झारखंडमध्ये एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यानंतर असाच एक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या आईला जीव गमवावा लागल्याचा आरोप मृत वीरपत्नीच्या मुलाने केला आहे. 'आधार'उपलब्ध नसल्याने सोनीपतमधील एका रुग्णालयाने तत्काळ उपचार नाकारल्याचा आरोप वीरपत्नीच्या  मुलाने केला आहे.


आईला जीव गमवावा लागल्याचा आरोप


आईची प्रकृती खुपच खालावली होती. त्यांना जेव्हा सोनीपतमधील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले, तेव्हा रुग्णालय प्रशासनाने त्यांच्याकडे आधार कार्डची मागणी केली. त्याक्षणी आपल्याकडे आधार कार्ड उपलब्ध नव्हते. ते आपण मोबाईलमधून रुग्णालय प्रशासनाला दाखवले, असं मुलगा पवनने सांगितलं.


उपचार करण्यास नकार दिल्याचा आरोप


तसेच रुग्णालयाने आईवर तत्काळ उपचार सुरु करावेत. काही वेळातच आपण आधार कार्ड आपण जमा करु असेही त्यांनी प्रशासनाला सांगितले. मात्र, तरीही प्रशासनाने आईवर उपचार करण्यास नकार दिल्याचा आरोप पवन यांनी केला आहे. यामुळे त्वरीत उपचार न मिळाल्याने आईचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.


उपचार नाकारण्यात आले नव्हते-स्पष्टीकरण


रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, आमच्याकडून उपचार नाकारण्यात आले नव्हते. उलट संबंधीत महिलेला रुग्णालयात उपचारांसाठी आणलेच नव्हते असा दावा त्यांनी केला आहे. 


आम्ही कधीही आधारसाठी कुठलाच उपचार थांबवलेला नाही. आधार कार्ड गरजेचे असले तरी ते कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी असून उपचारांसाठी नाही, असे स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात  आल्याचं सांगण्यात येत आहे.