अर्णब गोस्वामी अटक प्रकरण : अन्वय नाईक यांच्या पत्नीने मानले पोलिसांचा आभार
२०१८ मधील अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण
ऋचा वझे, झी मीडिया, मुंबई : '२०१८ हे वर्ष आम्ही कधीच विसरू शकत नाही. आज महाराष्ट्र पोलिआंनी जो दिवस आणलाय त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. सुसाईड नोट मध्ये नाव असून कारवाई त्यावेळी करण्यात आली नाही. पण आज ती केली आहे म्हणून पोलिसांचे आभार मानते', या शब्दात आज अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी आभार मानले आहेत.
अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणात आज रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे. अलिबाग न्यायालयात आज अर्णब गोस्वामीला हजर करण्यात येणार आहे. २०१८ साली अन्वय नाईक यांनी रिपल्बिक चॅनलचे इंटिरिअरचे काम केले होते. त्यावेळी कामाचे पैसे न दिल्यामुळे नाईक यांनी आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी अर्णब गोस्वामीच्या नावाचा उल्लेख केला होता. या संदर्भात आज अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली.
सुसाईड नोटमध्ये फिरोज शेख, अर्णव गोस्वामी यांचं नाव होतं. तरीही त्यावेळी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अर्णव गोस्वामी यांनी मुद्दाम रक्कम परत दिली नाही, असा आरोप अक्षता नाईक यांनी केला आहे. कोव्हिड व्हायरस नाही तर अर्णव गोस्वामी नावाचा हा व्हायरस आहे, असं देखील त्या यावेळी म्हणाल्या.
पैसे देणारच नाही कसे मिळतील बघतोच अशी धमकी देखील अर्णब गोस्वामीने दिल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच मुलीचं करिअर बरबाद करेल अशी धमकी फिरोज आणि अर्णब गोस्वामी यांनी दिली होती. अर्णव गोस्वामीचं स्टेटमेंट तेव्हा रेकॉर्ड झालं होतं. Joint cp च्या ऑफिस मध्ये रेकॉर्ड झालेलं इतकं प्राधान्य अर्णब गोस्वामीला का? असा सवाल देखील करण्यात आला आहे.
इंटिरिअरच्या कामाचे एकूण 83 लाख रक्कम नाईक कुटुंबियांना येणं आहे. याबाबत महाराष्ट्र पोलिसांना चौकशीची विनंती करण्यात आली आहे. तसेच त्यावेळेचे तपास अधिकारी वराडे यांची सुद्धा चौकशी करण्याची मागणी केली आहे.
काय आहे हे प्रकरण?
अन्वय नाईक यांनी रिपब्लिकन tv चॅनलच्या स्टुडीओच्या इंटेरियर डिझाईनचे काम केले होते. यासाठी 5 कोटी 40 लाख एवढे बिल अर्णव गोस्वामी यांच्याकडून घेणे होते. परंतु वारंवार बिल मागूनही अर्णव गोस्वामी यांच्याकडून बिल दिले जात नव्हते. त्यामुळे मानसिक तणावाखाली अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी नाईक यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येस अर्णब याला जबाबदार धरलं होतं. तसेच त्यांच्या आईने देखील आत्महत्या केली आहे. या घटनेसंदर्भात अन्वय नाईक यांच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून रायगड पोलिसांकडून कलम 306 अन्वये कारवाई करण्यात आली आहे