मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एनसीबीला तपासासाठी भरपूर वेळ दिलेला आहे. त्यामुळे आर्यन खानची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी केली जात आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आर्यन खानच्या वकिलांनी लगेच जामीन अर्ज दाखल केला. पण जामिन अर्जावरची  सुनावणी उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे.  (aryan khans lawyer satish maneshinde told court during drugs case hearing)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायालयात दोन्ही बाजूंनी बरेच युक्तीवाद झाले. आर्यन खानचे वकील सतीश मनेशिंदे आणि एनसीबीचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला. आर्यन खानसह 7 जणांच्या कोठडीची मागणी करत याप्रकरणात आणखी छापेमारी सुरु असून अटक केलेल्यांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे, त्यामुळे आरोपींना एनसीबी कोठडी द्यावी असा युक्तीवाद एनसीबीच्या वकीलांनी केला. पण न्यायालयाने एनसीबीची ही विनंती फेटाळून लावली. 


आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी युक्तीवाद करताना या प्रकरणाबाबतचा सर्व घटनाक्रम मांडला. एनसीबी चौकशी आर्यनने नेमकं काय-काय सांगितलं ते सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयात सांगितलं.


- एनसीबीचं म्हणं आहे की त्यांना मुख्य आरोपींपर्यंत पोहचायचं आहे, पण जोपर्यंत मुख्य आरोपी सापडत नाही, तोपर्यंत ते आर्यन खानला अटकेत ठेवू शकत नाहीत.


- ज्या व्हॉट्सअॅप चॅटबद्दल उल्लेख केला जात आहे तो फुटबॉलबद्दल आहे. यात कोणत्याही ड्रग्सचा उल्लेख नाही. तुम्हाला असं म्हणायचं आहे की एक वर्षापूर्वी आर्यन खान फुटबॉलबद्दल गप्पा मारू शकत नाही?


- कोणासमोर तरी बसवून चौकशी करायाची आहे म्हणून आर्यनला पुन्हा कोठडी पाठवणं हे कारण असू शकत नाही, आता क्रूजच्या आजोकांनाही अटक करण्यात आलेली आहे. आता षडयंत्र रचले जाईल की क्रूझवरील बाकीच्या लोकांशी आर्यनचा काही संबंध आहे का?


- संपूर्ण क्रूजवर एकही प्रवासी नव्हता, फक्त बॉलिवूशी संबंधित व्यक्ती होती, असं भासावलं जातंय. पण आर्यनचा कोणाशीही संबंध नाही.


- 'आर्यनचा एक मित्र प्रतीक गाबा आहे. त्याने आयोजकांशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीशी ओळख करून दिली. ते म्हणाले की आर्यनला व्हीव्हीआयपी म्हणून बोलावले जाईल. व्हीआयपी सूट उपलब्ध असेल. क्रूझवर थोडा रंग भरेल, म्हणूनच आर्यन तिथे गेला


- 'क्रूझवर थोडे बॉलिवूड ग्लॅमर दिसेल म्हणून आर्यनला आमंत्रित केले गेलं होतं. क्रूझवर 1,300 लोक होते, पण केवळ 17 जणांना अटक करण्यात आली


- क्रूझवर जाण्याआधी आर्यनला ड्रग्सबाबत प्रश्न विचारण्यात आले. आर्यनच्या बॅगेची तपासणी करण्यात आली, पण त्यांना आक्षेपार्ह असं काहीही मिळालं नाही.


- अरबाझ मर्चंटबरोबर दोस्ती असल्याचं आर्यन नाकारत नाही, पण या पूर्ण प्रकरणाशी त्याचा काहीही संबंध नाही. 


- तुम्ही कधीही चौकशीसाठी बोलावू शकता, गेल्या सात दिवसांपासून आर्यन एनसीबीच्या ताब्यात आहे, पण षडयंत्र उघडकीस आणणारी कोणतीही माहिती मिळालेली नाही.


- आर्यनला कोठडीत का पाठण्यात यावं, त्याच्याकडे कोणतंही ड्रग्स सापडलेलं नाही. त्याच्या बॅगेत काहीही मिळालेलं नाही. त्याने आपल्या फोनशीही छेडछाड केलेली नाही. एनसीबीला आतापर्यंत काहीही पुरावे सापडले नाहीत, तर यापुढे काय करणार? असा प्रश्नही सतीश मानेशिंदे यांनी उपस्थित केला.