मुंबई : २६ जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफ सुरु होत आहे. मुंबईतील हॉटेल, पब, मॉल, मल्टीप्लेक्स आता २४ तास सुरू राहणार आहेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी काल बोलावलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतं आहे. बैठकीला मनपा आयुक्त प्रवीण परदेशी, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे उपस्थित होते. तसंच हॉटेल आणि मॉल मालकांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. यामुळे आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई नाईट लाईफला हिरवा कंदील मिळाला आहे. याआधीच आदित्य ठाकरे यांनी ही इच्छा व्यक्त केली होती. पण फडणवीस सरकारने याला महत्त्व दिलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मात्र नाईट लाईफमुळे नागरिकांची शांतता भंग होणार असेल तर याला कडाडून विरोधी करु अशी प्रतिक्रिया दिली आहे. 



नाईट लाईफचं हे चित्र आता लवकरच मुंबईत दिसणार आहे. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शासकीय विश्रामगृहावर हॉटेल व्यावसायिक, मॉल्सचे प्रतिनिधी तसेच पोलीस दलातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नाईट लाईफचा आढावा बैठक घेतली. याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.