अशोक सावंत हत्येप्रकरणी महत्वाचे धागेदोरे हाती
अलीकडेच एका जागेच्या व्यवहारात त्यांनी मध्यस्थी केली होती. त्यांच्या विभागात झोपडपट्टी पुर्नविकासाचे अनेक प्रकल्प सुरू आहेत.
मुंबई : कांदिवलीतले माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी काही महत्वाचे धागेदोरे हाती आले आहेत. पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. सावंत हे त्याच्या विभागात केबलचा व्यवसाय करत असतं. त्यांना याआधी दोन वेळा धमकीचे फोनही आले होते..त्याबाबत त्यांनी पोलीसांकडे तक्रारही केल्याचं पुढे आलं आहे.
एका जागेच्या व्यवहारात मध्यस्थी
अलीकडेच एका जागेच्या व्यवहारात त्यांनी मध्यस्थी केली होती. त्यांच्या विभागात झोपडपट्टी पुर्नविकासाचे अनेक प्रकल्प सुरू आहेत.
सावंतांच्या दुचाकी स्वाराचे नियंत्रण सुटलं
काल संध्याकाळी सावंत एका मोटरसायकल स्वारासोबत एव्हॅन्यू हॉटेलमध्ये जेवण करून घरी निघाले होते.त्याचवेळी मागून आलेल्या एका दुचाकीस्वारानं त्यांच्या गाडीजवळून वेगात गाडी नेली. त्यामुळे त्यांच्या सावंतांच्या दुचाकी स्वाराचे नियंत्रण सुटलं.
चॉपरने सावंतांवर चॉपरचे वार
सावंत गाडीवरून पडले. मागून आलेल्या एका रिक्षातून काही अज्ञात तरूण आले, त्यांनी एका चॉपरने सावंतांवर चॉपरचे वार करून त्यांची हत्या केली.