नवी दिल्ली : देशातील पहिले राफेल आणण्यास फ्रान्समध्ये गेलेल्या राजनाथ सिंह यांनी त्याची शस्त्रपुजा केली. लिंबू, नारळ वाढवून केलेल्या या शस्त्रपुजेची देशभरात चांगली चर्चा झाली. विरोधकांनी यावर कडाडून टीका केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील याबद्दल प्रश्न उपस्थित केले. पण सध्या काँग्रेसवर नाराज असलेल्या संजय निरुपण यांनी स्वत:च्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. शस्त्रपुजा करणे काही तमाशा नाही. ही भारतीय समाजाची परंपरा आहे. अडचण ही आहे की मल्लिकार्जुन खर्गे हे नास्तिक आहेत आणि काँग्रेस पार्टीमध्ये जास्तजण हे नास्तिकच आहेत असे विधान निरुपम यांनी केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीत संजय निरुपम यांना काँग्रेसने तिकीट नाकारले होते. त्यानंतर मुंबई काँग्रेसची जबाबदारी मिलिंद देवरा यांच्याकडे दिली.



आता विधानसभा निवडणुकीतही निरुपम यांच्या मर्जीतील उमेदवाराकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले. या प्रत्येक घटनेत निरुपम यांनी वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त केली आहे.


४-५ जागा सोडल्या तर मुंबईत इतर ठिकाणी काँग्रेसचे डिपॉझिटही जप्त होईल असे ते म्हणाले होते.


आता तर त्यांनी खर्गे यांच्यावर निशाणा साधला आहे. मल्लिकार्जुन खर्गेंसारखे नेता काँग्रेसमध्ये तरुण पिढीला पुढे येऊ देत नसल्याचा आरोपही त्यांनी खर्गे यांच्यावर केला.