मुंबईत ठाकरेंना आव्हान! विधानसभेच्या 36 जागांपैकी `या` 18 जागांची शिंदेंकडून तयारी
Assembley Election 2024: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची निवडणूक लढवण्याची इच्छा असलेल्या 18 जागा कोणत्या आहेत? याबद्दल जाणून घेऊया.
Assembley Election 2024: मुंबईमध्ये विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. यापैकी 18 जागांची तयारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केली जातेय. यापैकी 4 ते 5 मतदारसंघात भाजपाशी चर्चा करून शिंदे यांची शिवसेना दोन पावलं मागे जाऊ शकते. मात्र मुंबईतील 13 ते 14 जागा लढवण्याच्या निर्णयावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ठाम असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळतेय. श्रीकांत शिंदे ही या जागांचा आढावा घेत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची निवडणूक लढवण्याची इच्छा असलेल्या 18 जागा कोणत्या आहेत? याबद्दल जाणून घेऊया.
उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ
- मालाड
- मागाठाणे
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ
- जोगेश्वरी *
- दिंडोशी
- अंधेरी पूर्व*
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ
- भायखळा
- शिवडी
- वरळी*
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ
- भांडुप पश्चिम
- विक्रोळी
उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ
- चांदीवली
- वांद्रे पूर्व
- कलिना
- कुर्ला
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ
- अणूशक्ति नगर
- चेंबूर
- माहीम
- धारावी*