Maharashta Assembly : विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी 164 मतं मिळवत बाजी मारली. बहुजन विकास आघाडी, मनसे, प्रहार आणि अपक्ष आमदारांनी शिंदे आणि भाजपा सरकारच्या बाजूने मतदान केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्याला गिरीश महाजनांनी अनुमोदन दिले. त्यानंतर नार्वेकरांच्या विरोधात शिवसेनेचे राजन साळवी यांच्या उमेदवारीसाठी प्रस्ताव राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी दिला तर काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी त्यास अनुमोदन दिलं. 


आवाजी मतदानाने मतदान घेण्यात आलं. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जागेवर उभं राहून आमदारांनी नाव आणि अनुक्रमांक उच्चारून हे मतदान पार पडलं.  शिंदे गटाच्या आमदारांनी प्रतोद सुनील प्रभू यांचा व्हिप झुगारून भाजपाचे राहुल नार्वेकर यांना मतदान केलं.


सुरुवातील शिंदे गट-भाजपच्या आमदारांनी उभं राहत आपलं नाव आणि नंबर पुकारत मतदान केलं. यावेळी शिंदे गटातील शहाजीबापू मतदानासाठी उभे राहिले. यावेळी सभागृहात एकच कल्ला झाला. शहाजीबापू पाटील यांचा ११२ वा क्रमांक होता. ते जागेवर उभे राहताच सभागृहातील आमदारांनी एका सूरात 'काय झाडी,काय डोंगार, काय हाटील' असा डायलॉग म्हटला. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.


तर प्रताप सरनाईक आणि यामिनी जाधव यांचा नंबर पुकारताच विरोधी बाकावरुन ईडी सुटकाचा टोला मारण्यात आला.