मुंबईत एटीएममधून कार्ड क्लोनिंग करून ३५ जणांना गंडा
मुंबईकरांनो जर तुम्ही एखाद्या एटीएममधून पैसे काढत असाल तर तुमचं कार्ड क्लोनिंग तर होत नाही ना याकडे लक्ष द्या. कारण मुलुंडमध्ये कोटक महिंद्रा बँकेच्या दोन एटीएममधून कार्ड क्लोनिंग करून आतापर्यंत पस्तीस जणांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मुंबई : मुंबईकरांनो जर तुम्ही एखाद्या एटीएममधून पैसे काढत असाल तर तुमचं कार्ड क्लोनिंग तर होत नाही ना याकडे लक्ष द्या. कारण मुलुंडमध्ये कोटक महिंद्रा बँकेच्या दोन एटीएममधून कार्ड क्लोनिंग करून आतापर्यंत पस्तीस जणांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
खात्यातून पैसे वजा झाल्याचे मेसेज
ज्या ग्राहकांनी काही दिवसांपूर्वी या एटीएमचा वापर केला होता त्या नागरिकांना कालरात्री अचानक आपल्या खात्यातून पैसे वजा झाल्याचे मेसेज आले त्यामुळे भेदरलेल्या नागरिकांनी नवघर पोलिस ठाणे गाठले.
दिल्लीतल्या गाझियाबादमधून पैसे काढले
या सर्व खातेदारांची रक्कम दिल्लीतल्या गाझियाबादमधून काढण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. काढण्यात आलेली ही रक्कम लाखोंच्या घरात आहे. तसेच नवघर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा तसेच आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.